logo

यूपीएससी परीक्षेमध्ये देशातून ८०९ क्रमांकाने निवड झाल्याबद्दल चि. सिध्दार्थ लक्ष्मण तागड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

यूपीएससी परीक्षेमध्ये देशातून ८०९ क्रमांकाने निवड झाल्याबद्दल चि. सिध्दार्थ लक्ष्मण तागड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


अहमदनगर  : केंद्रीय नागरी लोकसेवा आयोगाच्या २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल दि. १६ एप्रिल २०२४  रोजी जाहीर झाला. त्यामध्ये अहमदनगर येथील तसेच राहुरी कृषि विद्यापीठमध्ये गवत संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. लक्ष्मण निवृत्ती तागड व सौ. जयश्री लक्ष्मण तागड यांचे सुपुत्र चि. सिध्दार्थ लक्ष्मण तागड यांनी देश पातळीवरील परीक्षेत (UPSC) ८०९ रॅक मिळवुन दुस-या प्रयत्नात यश मिळवले.


चि. सिध्दार्थ यांनी बी. टेक (मॅकेनिकल) इंजिनिअरींग पदवी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (COEP), पुणे येथुन २०२१ साली प्राप्त केल्यानंतर नागरी केंद्रीय लोकसेवा आयोग या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. २०२२ साली घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी मुलाखती पर्यंत मजल मारली (प्रथम प्रयत्न), २०२३ साली घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी ८०९ रैंक प्राप्त करून यश संपादन केले. चि. सिध्दार्थ तागड यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण श्री समर्थ विदयामंदीर प्रशाला, सावेडी, अहमदनगर येथील विद्यालयात झाले असून  इ. १२ वी पर्यंतचे शिक्षण रेसिडेन्शिअल जुनियर कॉलेज, अहमदनगर येथे झाले आहे. २०१७ साली घेण्यात आलेल्या सीइटी परीक्षेत १७३/२०० गुण मिळवून उत्तीर्ण झाले .

चि. सिध्दार्थ यांचे वडील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सहाय्यक प्राध्यापक (संशोधन अधिकारी) म्हणुन कार्यरत असून चि. सिध्दार्थ ची आई सौ. जयश्री लक्ष्मण तागड गृहिणी आहेत. त्या उच्चशिक्षीत असल्यामुळे घरात शिक्षणाचे वातावरण होते त्यामुळे  सिध्दार्थ च्या शिक्षणाकडे लक्ष देऊन कुटुंब व्यवस्थित सांभाळत आहे, सिध्दार्थ च्या यश मिळवण्यामागे आईचा सिंहाचा वाटा आहे.

चि. सिध्दार्थ लक्ष्मण तागड यांची युपीएससी (UPSC) परीक्षेमध्ये देशातून ८०९  क्रमांकाने निवड झाल्याबद्दल नातेवाईक, मित्र परिवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून अभिनंदन केले व सिध्दार्थ  ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

15
425 views